Published On : Mon, Oct 7th, 2019

विदर्भात विरोधी पक्ष् होणार भूईसपाट:गडकरी यांची घोषणा

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी शक्तीप्रदर्शनासह केला उमेदवारी अर्ज दाखल: पाच ही आमदारांनी भरले उमेदवारी अर्ज

नागपूर: आज देवेंद्र यांच्या नेर्तृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राची निवडणूक लढवली जात आहे. मागच्या वेळी जेवढे यश मिळाले त्यापेक्ष्ाही किती तरी मोठे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असाच आज संकल्प करा,गेल्या वेळी विदर्भात तांत्रिक चुकीमुळे सावनेरची एक जागा राहून गेली होती,यावेळी संपूर्ण विदर्भात शत-प्रतिशत युतीचाच विजय होणार असल्याची घोषणा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील पाच ही आमदारांसह शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी सभेला संबोधित करताना गडकरी यांनी हे भाष्य केले.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शुक्रवारी सकाळी ११ वा. संविधान चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री यांनी माल्यापर्ण केले. यानंतर भव्य शक्तीप्रदर्शनासह त्यांचा ताफा आकाशवाणी चौकात तहसील कार्यालयाकडे वळला. प्रचंड मोठा जनसमूह रॅलीत उपस्थित होता. भगवे झेंडे व भगव्या पताका यासोबतच शिवसेना तसेच रिपाई(आठवले)गट यांच्याही पताका रॅलीत डोलाने लहरत होत्या. एकाच वाहनावर मुख्यमंत्री यांच्यासह पाचही उमेदवार,गडकरी तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष् चंद्रकांत पाटील, सुलेखा कुंभारे, चंद्रशेचर बावणकुळे,शहराध्यक्ष् प्रवीण दटके,विकास महात्मे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,की पाच वर्षात महाराष्ट्रासह नागपूरात ही आमुलाग्र बदल झाला आहे. फडणवीस यांनी विदर्भ,महाराष्ट्राचे चित्र बदलले आहे. महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून जेवढा पैसा गेल्या सरकारने नाही दिले तेवढा पैसा फडणवीस यांनी विदर्भाला दिला आहे. विकासाच्या आपल्या अपेक्ष्ा फडणवीस यांनी पूर्ण केल्या आहेत.गांव,गरीब,मजूर,शेतकरी,युवा सगळ्यांचे समर्थन भाजप,शिवसेना,रिपाईच्या या युती सरकारला मिळाले.कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या पुढे ही कार्यकर्त्यांना खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे. मी देवेंद्रला शब्द दिला आहे त्यांनी फक्त अर्ज भरावा व महाराष्ट्रात लक्ष् घालावे,त्यांच्या मतदार संघात एक लाखांहून जास्त मतांनी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही माझी आहे.

एेतिहासिक असा विजय महाराष्ट्रात मिळवणार-फडणवीस
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र राज्याने सरकार स्थापनेपासून मोठे परिवर्तन महाराष्ट्रात पाहीले आहे, त्यापेक्ष्ाही मोठे परिवर्तन पुढील पाच वर्षात महाराष्ट्राची जनता बघेल. देशातील सर्व राज्यात निर्विवादपणे महाराष्ट्र हे पहील्या क्रमांकावर आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूर शहराने जो विकास बघितला आहे त्यामुळे देशातील पाच विकसित शहरांमध्ये नागपूरचा क्रमांक लागला. शेतकरी यांच्या जीवनात परिवर्तन झाले. मोंदीच्या नेतृत्वात लोकसभेसाठी जनतेने जो विश्‍वास दाखवला तोच विश्‍वास युती सरकारला महाराष्ट्रात ऐतिहासिक असा सर्वात मोठा विजय मिळवून देणार आहे.

पुढची पाच वर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला पारदर्शक कारभार बघायला मिळणार आहे. दीन-दलित,अल्पसंख्यांक यांच्यासोबतच महाराष्ट्र आणखी पुढे नेऊ, ‘सबका साथ सबका विकास सबका विश्‍वास’याच तत्वावर महाराष्ट्राला पुढे नेणार असल्याचे ते म्हणाले. नागपूर शहरातून भाजपच्या सहाही उमेदवारांचा विजय हा सुनिश्‍चित आहे. फक्त विजयी होणे हे ध्येय नाही तर ‘प्रचंड जनादेश’ आम्ही मिळवणार आहोत. तुमच्या आर्शिवादाने आम्हाला रॅकॉर्ड जीत हवी आहे. नागपूरचा आर्शिवाद घेऊन मुंबईला जातोय,मुंबईत महायुतीचा झेंडा लावतो,असाच पुन्हा आर्शिवाद द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

Advertisement