नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रमात ‘ऑन दि स्पॉट’ निकालावर भर असतो. रविवारी (दि. १३ एप्रिल) पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. बुलढाण्यातून आलेल्या दिव्यांगांना मदत व्हावी यासाठी ना. श्री. गडकरींनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. थोड्याच वेळात मंत्री महोदयांचे पत्र सोबत आलेल्या दिव्यांगांना सोपवण्यात आले. तसेच मदत मिळण्याचा मार्गही मोकळा झाला.
खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी सकाळपासूनच ना. श्री. गडकरी यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. कुणी वैयक्तिक तर कुणी प्रशासकीय अडचणींच्या संदर्भात निवेदने दिली. यातच बुलढाण्याहून मतिमंद निवासी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत मिळावी असे निवेदन काहींनी दिले. त्यानंतर ना. श्री. गडकरी यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना फोन लावला. त्यांना केंद्र सरकारच्या अॅडीप योजनेतून दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करण्याची सूचना केली. विशेष म्हणजे अगदी काही मिनिटांतच ना. श्री. गडकरी यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही गेले. त्यावेळी निवेदन देण्यासाठी आलेल्या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.
नागपुरातील अयोध्यानगर परिसरातील काही नागरिकांनी नाल्याचे पाणी वस्तीत शिरत असल्याचा मुद्दा निवेदनाद्वारे मांडला. यासंदर्भात ना. श्री. गडकरी यांनी त्याच क्षणी मनपा आयुक्तांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली आणि तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. काही नागरिकांनी गेल्या जनसंपर्क कार्यक्रमात दिलेल्या निवेदनावर कार्यवाही झाल्याचे सांगत मंत्री महोदयांचे आभार मानले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तरुणीने ना. श्री. गडकरी यांना नोकरीच्या संदर्भात निवेदन