Published On : Sun, Aug 29th, 2021
By Nagpur Today Nagpur News

परिवहन सभापतींच्या सीएनजी कारमध्ये गडकरींची ‘राईड’

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या गाड्या सीएनजीवर परिवर्तित कराव्या, असे आवाहन केंद्रीय नितीन गडकरी हे जाहीर कार्यक्रमातून वारंवार करतात. मनपाचे परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी यात बाजी मारली. त्यांनी सीनजीवर परिवर्तित केलेल्या कारमध्ये आज खुद्द ना. नितीन गडकरी यांनी सहा कि. मी.ची राईड करीत कुकडे यांचे कौतुक केले.

Gold Rate
Tuesday25 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 96,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या राईडदरम्यान ना. गडकरी आणि सभापती बंटी कुकडे यांच्यात शहरातील पर्यावरणपूरक वाहतुकीवर चर्चा झाली. कुकडे यांनी सांगितले की, मनपाच्या बसेससुध्दा सीएनजीवर चालतात आहे. मनपाच्या शहर बस वाहतुकीत इलेक्ट्रिक बसेसचाही समावेश आहे. नागपूर स्मार्ट सिटीतर्फे १५ इलेक्ट्रिक बस घेण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली. परिवहन समिती सभापती म्हणून पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे, हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्याची सुरुवात स्वतःपासून केल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. बंटी कुकडे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल ना. नितीन गडकरी यांनी त्यांचे कौतुक केले. असा पुढाकार मनपातील प्रत्येक पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पुढील पाच वर्षात नागपूर प्रदूषणमुक्त व्हावे, यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या वेळी परिवहन विभागाचे रवींद्र पागे उपस्थित होते.

Advertisement