Published On : Fri, Mar 5th, 2021

रेशीमबागेतील श्रद्धास्थानात गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात संपन्न

Advertisement

रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपले वंदनीय परमपूजनीय समर्थ सद्गगुरु श्री संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या प्रगटदिनी शुक्रवारी कोरोना नियमांचे पालन करीत भाविकवृंदांतर्फे श्रींचा प्रगटदिन साजरा करण्यात आला.

यावर्षी पालखीचे आयोजन नसल्याने गजानन महाराज यांच्या रथाचे पूजन नागपूरचे लोकप्रिय महापौर दयाशंकरजी तिवारी यांचे शुभहस्ते तसेच नरकेसरी प्रकाशन चे अध्यक्ष डाॅ विलासजी डांगरे, डॉ रवींद्र भोयर, सौ शीतल कामडी, आणि श्रद्धास्थानचे संयोजक गिरीशजी वराडपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यानंतर पालखीचे आयोजन नसल्यामुळे श्रीना विविध गजर व नामस्मरणानी 21 परिक्रमा करण्यात आल्यात, भाविकांनी श्रींच्या मुळ प्रतिमेला औक्षवाण व पुजन केले .

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पालखीत श्री गजानन जय गजानन , गण गण गणांत बोते , ओम गजानन नमो नम , गुरु गजानन माझे आई मजला ठाव द्यावा पायी , आदी मंत्रांच्या गजराने श्रद्धास्थानातील वातावरण शेगावमय झाले, याच प्रसंगी महापौर दयाषंकरजी तिवारी यांचे हस्ते कोरोनाशी लढत असलेल्या गरजूना रक्तदानाची मदत मिळावी या सद्हेतूने श्रद्धास्थान तर्फे 25 बॉटल रक्तदान हेडगेवार रक्तपेढीला देण्यात आले.

सकाळी 10 वाजता मृत्युन्जय मंत्राचे जप अधिष्ठान व श्रीना अभिषेक, शेज व मंगल आरती करण्यात आली, या प्रगटदिनाच्या यशस्वी आयोजन नरेंद्र गोरले , प्रकाश निमजे, बाळ भेंडे , दीपक वाळके, नरेश ईटनकर, रमाकांत पेंडके , अरविंद पिट्टलवार, आदित्य देव, मोहन रसेकर, कुशल ठावकर, सागर राऊत, सीमा पेंडके , दीपाली निमजे, लताताई तेलंग, मंगला पोटे, ज्योती तितरमारे, भारती वाळके, ममता मानकर,चित्रा मानकर, आशु पोहणे,सायली सांगोले, गीता मौदेकर, समृद्धी वराडपांडे ,वैजयंती अटाळकर, प्रांजली देव, मन्साराम उसेंडी, यांचे सहकार्य लाभले. सोमवार 8 मार्च रोजी सकाळी 9 वा श्रीसत्यनारायण पूजन, गोपाळकाला आणि श्रीचा प्रसाद वितरित करण्यात येईल असून आपण भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करत श्रींच्या सेवाकार्यात सहभागी होऊन श्रीं च्या प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती..
जय गजानन…

Advertisement