नागपूर : केंद्रासह महाराष्ट्र तसेच मध्या प्रदेशातसुद्धा भाजपाचे सरकार आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहर नागपूर येथील भाजपा महिला नेता सना खान हीची जबलपूर येथे 2 ऑगस्ट रोजी निर्घृण हत्या झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्र व चॅनल्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहे. महिला सुरक्षिततेच्या गोष्टी करणाऱ्या भाजपला स्वतःच्याच महिला पदाधिकारीच्या हत्येचा विसर पडल्याचे दिसून येत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नागपूर शहर प्रवक्त्या नूतन रेवतकर यांनी केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे , गृहमंत्री फडणवीस यांचे सह जवळपास सर्वच वरिष्ठ नेत्यांसोबत सना खान यांचे जवळचे संबंध असल्याचे अनेक फोटोच्या माध्यमाने दिसून येते. शोकांतिका अशी आहे की , 2३ दिवस उलटूनही आज पर्यंत सना खानच्या प्रकरणात एकही भाजपचा नेता किंवा पदाधिकारी ने समोर येवून परिवाराचे सात्वन किंवा साधी शोक सभा घेऊन श्रद्धांजली सुध्दा दिली नाही. यावरून भाजपचे महिला सुरक्षेचे दावे फोल ठरले आहे.
वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या वरून एक गोष्ट मात्र नक्की आहे की, या प्रकरणात एखाद्या भाजपच्याच बड्या नेत्याचा हाथ तर नाही ना अशी शंका येते. नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्वतः ह्या प्रकरणात लक्ष घालून त्यांच्या नेतृत्वातील टीम ने अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्याचे कौतुकास्पद काम केले आहे. यामागचा मास्टर माईंड कुणी भाजपाचा बडा नेता तर नाही ज्याने सुपारी देवून हत्या घडवून आणली. ह्याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. जर भाजपाचे असे म्हणणे असेल की , सना खान ब्लॅकमेल करायची म्हणून कुणी समोर येत नाही तर तुम्हाला माहित असल्यावर तुम्ही तिला एका महत्वाच्या पदावर कसे नियुक्त केले होते. याचा देखील खुलासा होणे गरजेचे आहे.
एकंदरीत प्रकरणावरून असे लक्षात येते की , सना खान गृहमंत्री ते अनेक मोठ्या भाजप नेत्याच्या संपर्कात होती. मध्यप्रदेश मध्ये सनाची हत्या झाली तिथे सुध्दा सरकार भाजपाचीच सरकार आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री च्या शहरातील व जवळची असून सुध्दा सना खान हत्येचा तिढा सुटलेला नाही. तसेच अद्यापही तिचा मृतदेह मिळाला नाही, हे भाजपा चे अपयश आहे. हे पाहता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जवाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर शहर प्रवक्त्या नूतन रेवतकर यांनी केली आहे.