Advertisement
नागपूर: महाराष्ट्रासह आज अवघ्या देशात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. हा सण देशातील बहुतांश राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.नागपुरातही ढोl ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातील स्थानिक नेत्यांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहे.
केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. गडकरी यांचे चिरंजीव सारंग गडकरी यांनी गणेशाची स्थापना करून विधिवत पूजा केली. याप्रसंगी पत्नी कांचन गडकरी, मुलगा सारंग गडकरी, स्नुषा ऋतुजा निखिल गडकरी, मधुरा सारंग गडकरी, नातवंडे निनाद, अर्जुन, सावनी व नंदिनी उपस्थित होते. गणेश चतुर्थीनिर्मित्त गडकरी यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या.