Published On : Tue, Sep 13th, 2022
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या आव्हानाला गणेश मंडळांचा भरभरून प्रतिसाद

कोराडीत ५७३ हुन अधिक गणरायांचे विसर्जन

नागपूर:. मोठ्या धुमधडाक्यात साजरा झालेल्या गणेशोत्सवाची सांगता झाली. भक्तांनी वाजत-गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक ठरला. पर्यावरण संरक्षणाच्या उद्धेशाने महानगरपालिकेने राबविलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाला नागरिकांसह विविध गणेश उत्सव मंडळांनी भरभरून प्रतिसाद दिला. चार फूटापेक्षा मोठ्या गणरायाची स्थापना केलेल्या सर्वच गणेश उत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या विशेष कृत्रिम तलावात कोराडी येथे मनपातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याचा लाभ घेत तब्बल ५७३ हुन अधिक गणरायांचे विसर्जन कोराडी येथे करण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असतांना नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी मनपाने कोराडी परिसरात विशेष व्यवस्था केली होती. निर्माल्य संकलनासह स्वच्छेतेची विशेष काळजी घेण्यात आली. मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी नागपूरकरांचे कौतुक करीत आभार मानले.

Gold Rate
Monday 03 Feb. 2025
Gold 24 KT 82,400 /-
Gold 22 KT 76,600 /-
Silver / Kg 93,300 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर, नाईक तलाव, लेंडी तलाव, पोलिस लाईन टाकळी यासह सर्वच तलावांमध्ये विसर्जनास पूर्णतः: बंदी घालण्यात आली होती. तर चार फूटापेक्षा मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मनपाद्वारे कोराडी तलाव परिसरात मोठ्या सिमेंटच्या हौदाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच गणेश मंडळांना विसर्जन करतांना अडचण येऊ नये यासाठी कोराडी तलाव परिसरात विशेष सहाय्य्यता केंद्र तयार करण्यात आले होते, तसेच विसर्जन परिसरात हायमास्ट लाईट, क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच रुग्णवाहिकांची ही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हौदाच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. परिसरात मजबूत अशी लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात आली होती. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. दीपककुमार मीना, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक व उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले व्यवस्थेवर संपूर्णतः लक्ष देऊन होते.

तब्बल १,४४,९२२ गणेश मूर्तींचे विसर्जन

श्री गणेश विसर्जनासाठी मनपाद्वारे प्रभाग निहाय २०४ ठिकाणी ३९० कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते.

झोन नाव कृत्रिम तलाव मूर्तीचे विसर्जन

-लक्ष्मीनगर झोन ३५ कृत्रिम तलाव १६,१८५

-धरमपेठ झोन ६७ कृत्रिम तलाव २७,३३२

-हनुमानगर झोन ४८ कृत्रिम तलाव १३,५६०

-धंतोली झोन ३७ कृत्रिम तलाव ११,१८०

-नेहरूनगर झोन ४४ कृत्रिम तलाव २३,२८५

-गांधीबाग झोन ४१ कृत्रिम तलाव १४,४०६

-सतरंजीपुरा झोन २७ कृत्रिम तलाव १३,०१०

– लकडगंज झोन ४० कृत्रिम तलाव १२,८३०

-आशीनगर झोन १५ कृत्रिम तलाव २२१४

-मंगळवारी झोन ३६ कृत्रिम तलाव १०३४७

– कोराडी कृत्रिम तलावात ५७३
एकूण १ लाख ४४ हजार ९२२ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेश मूर्ती विजर्सनासह मनपाद्वारे १५४. २४ टन निर्माल्य संकलित

मनपाद्वारे श्रीगणेशाच्या पर्यावरणपूरक विसर्जनासाठी प्रभाग निहाय ३९० कृत्रिम विजर्सन तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये मातीच्या १ लाख ३३ हजार ४५१ मूर्तीचे तर ११ हजार ४७१ पीओपी मूर्ती अशा एकूण १ लाख ४४ हजार ९२२ मूर्ती विसर्जित करण्यात आले. याशिवाय ठिकठिकाणी निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. यात तब्बल १५४. २४ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. गणेशोत्सवातील निर्माल्याचे धार्मिक महत्व लक्षात घेता, हे निर्माल्य नेहमीच्या कच-याबरोबर न टाकता, जमा झालेल्या निर्माल्य भांडेवाडी येथील कंपोस्टींग प्लॅंटमध्ये स्वतंत्र्यरित्या संकलीत करून, त्यावर प्रक्रीया करून खत निर्मिती केल्या जाणार आहे. निर्माल्यापासून तयार झालेल्या या खताचा वापर मनपाच्या सर्व सार्वजनिक उद्यानात केला जाईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

Advertisement