Published On : Tue, Sep 19th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील गणेश मंडळांना प्रसाद वितरणासाठी घ्यावी लागणार एफडीएची परवानगी !

Advertisement

नागपूर : शहारत आता गणेशोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन मंडळांकडून केले जात असताना प्रसाद वाटण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. जर मंडळांनी नोंदणी केली नाही तर एफडीएने कारवाईचा इशारा दिला आहे.

गणेश भक्तांना मंडळांकडून दिला जाणारा प्रसाद गुणवत्तापूर्ण असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक पाऊले उचलली आहे. मंडळांनी स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, प्रसाद स्वत: तयार करून वितरित करणाऱ्या मंडळांनी एफडीएच्या https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर १०० रुपयांचे शुल्क भरून नोंदणी करावी, असे आवाहन एफडीएचे सहआयुक्त अभय देशपांडे यांनी केले.

Advertisement
Wenesday Rate
Wed 25 Dec. 2024
Gold 24 KT 76,300/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement