खैरी,नेरी आवंढी व आजनी गावात एक गाव एक गणपती
कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दहा दिवसीय गणेशोत्सव सोहळ्याला आज 2 सप्टेंबर पासून शुभारंभ झाला असून तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात आजपासून मोठ्या उत्साहाने ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत श्री ची मूर्ती स्थापना करण्यात आली .कामठी तालुक्यात विविध गणेश उत्सव मंडळाकडुन एकूण 101 ठिकाणी श्रीगणेशजींची मूर्ती स्थापना करण्यात आली.
राज्याचे तत्ककालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीने एक गाव एक गणपतीची सुरुवात केली होती ता संकल्पनेनुसार गणेशोत्सवात गावाची शांतता अबाधित राखण्यासाठी कामठी तालुक्यातील खैरी, नेरी , आवंढी व आजनी या चार गावात एक गाव एक गणपती ची स्थापना करण्यात आली आहे.2 सप्टेंबर पासून सुरू झालेले गणेशोत्सव यावर्षी एकूण 10 दिवस चालणार असून 12 सप्टेंबर ला श्री मूर्तीचे साश्रु नयनाने विसर्जन होणार आहे तर शहर तसेच ग्रामीण भागात स्थापित झालेल्या श्री मूर्ती ठिकाणी आजपासूनच पूजा आरतीला सुरुवात झाली आहे .
तर सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी ची सोय व्हावी या मुख्य उद्देशाने नवीन कामठी पोलीस स्टेशन स्थित एसीपी राजेश परदेशी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून गुप्त विभागाचे मयूर बन्सोड व ओमप्रकाश खंडाते , समाधान पांढरे, अश्वजित फुले यांच्या वतीने करण्यात आली आहे गणेशोत्सवाचा आनंद घेण्यात सर्व भाविक मग्न आहेत या गणेशोत्सवात एक उत्साहपूर्वक वातावरण निर्माण झाले आहे.
संदीप कांबळे कामठी