नागपूर : रामटेक गडमंदिर परिसरात जोडप्यास लुटणाऱ्या टोळीचा छडा नागपुर ग्रमीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे. फिर्यादी शुभम वासुदेव मोहनकर ( वय २७ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ काचुरवाही ता. रामटेक जि. नागपूर) याने रामटेक पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
मोद राजेंद्र सहानी (वय २३ वर्ष, रा. क्वार्टर क्र. ५१४, खदान क्र. ३, कन्हान), विक्की निशाद( रा. खदान क्र. ३ कन्हान ) आणि संतोष (रा. इलाहबाद) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार, शुभम मोहनकर हे आपल्या होणाऱ्या पत्नीसह रामटेक गडमंदीर परिसरात मोटर सायकलने फिरायला गेले होते. गडमंदीर ते अंबाडा कडे जाणाऱ्या रोड वर ते दोघेही एका ठिकाणी थांबले असतांना एका होन्डा शाईन मोटर सायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांनाजिवेमारण्याची धमकी देत त्यांच्याकडून रोख रक्कम आणि काही वस्तू हिसकावून घेत त्याठिकाणाहून पळ काढला.
फिर्यादीचे तोंडी दिलेल्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी अप. क्र. १४२/२३ कलम ३९२, ३४ भादवि. अन्वये गुन्हा नोंदविला. स्थानिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्यातील आरोपींचा छडा लावला. पोलिसांनी कन्हान परिसरातून तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून हिसकावून नेलेल्या हिरव्या रंगाचा रियलमी फोनसह एकूण ६६,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याअगोदरही आरोपी प्रमोद राजेंद्र सहानी यांच्यावर चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून याची कसून चौकशी करण्यात आहे.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, भा.पो.से. अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श ओमप्रकाश कोकाटे, पोलीस सपोनि राजीव कर्मलवार, हवालदार गजेंद्र चौधरी, रोशन काळे नापोशि विपीन गायधने, रोहन डाखोरे, चालक अमोल कुथे तसेच सायबर सेलचे सतिष राठोड यांच्या पथकाने केली.