नागपूर :नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा तस्करीच्या गुन्ह्यात ओडिशातून एका तस्कराला अटक केली आहे. जुलै महिन्यात रेल्वे पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकातून चार जणांना गांजाची तस्करी करताना अटक केली होती आणि हा गांजा ओडिशातून पकडलेल्या या तस्कराने त्यांना पुरवला होता.
13 जुलै रोजी लोहमार्ग पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वेत गांजाची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना पकडले होते. या अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रवींद्र राय, अमित कुमार द्वारका प्रसाद मिश्रा, भारतेंदू सिंग आणि विवेक विक्रम सिंग राजा यांचा समावेश आहे.
त्याच्याकडून सुमारे 32 किलो गांजा सापडला. चौकशीत त्याने हा गांजा ओडिशात राहणाऱ्या नेपाळी नावाच्या मित्राकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या तस्कराच्या शोधात दोनवेळा ओडिशा येथे गेले होते, तरीही त्यांना पकडता आले नाही.
मात्र,आता ओडीशातील नक्षलग्रस्त भागात जाऊन नेपाळ जगदीप दुर्गा नावाच्या या गांजा तस्कराला जेरबंद करण्यात पथकाला यश आले आहे.