नागपूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन होत आहे. नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी मंडळांचे आणि घरगुती गणपती विराजमान होत आहेत.सकाळपासून ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचं जोरदार आगमन सुरू झाले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीर शहरातील अनेक मंडळांनी देखावेही तयार केले असून त्यात विविध थिमवर आधाराती संस्कृती नागपुरकरांना अनुभवण्यास मिळत आहे.
नागपूरातील मोठ-मोठ्या गणरायांचेही आगमन मोठ्या थाटत करण्यात येत आहे. आता पुढचे दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्र गणेश भक्तीत रंगणार आहे. तत्पूर्वी गणेश स्थापना काशी करावी आणि मुर्हतासंदर्भात जाणून घेऊ या.
गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त
ज्योतिषांच्या मते, पंचागानुसार, 19 सप्टेंबर हा दिवस गणेश स्थापनेसाठी अतिशय शुभ आहे. 19 सप्टेंबर रोजी गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:01 ते दुपारी 01:28 पर्यंत आहे.
गणपती पूजनाचा मुहूर्त
असे मानले जाते की, श्रीगणेशाचा जन्म मध्यान्हकाळात झाला होता, म्हणून दुपारची वेळ गणेशपूजेसाठी अधिक शुभ मानली जाते. मध्य मुहूर्तामध्ये, भक्त पूर्ण विधींनी गणेशपूजा करतात, ज्याला षोडशोपचार गणपती पूजा असेही म्हणतात.
गणेशमूर्ती स्थापनेची पद्धत
सर्वप्रथम गंगाजल पदरावर शिंपडून घर शुद्ध करा.
यानंतर, चौरंगावर लाल रंगाचे कापड पसरवा आणि ते तसेच ठेवा.
श्री गणेशाची मूर्ती चौरंगावर बसवा.
आता गणपतीला स्नान करून गंगाजल शिंपडा.
रिद्धी-सिद्धीचे चिन्ह म्हणून मूर्तीच्या दोन्ही बाजूला एक एक सुपारी ठेवा.गणेशाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेले भांडे ठेवा.हातात अक्षता आणि फुले घेऊन गणपती बाप्पाचे ध्यान करा.भगवान गणेशाच्या मंत्राचा जप करा: ऊँ गं गणपतये नमः