Published On : Sat, Jun 29th, 2019

गार्गी चोपरा यांनी स्वीकारला मंगळवारी झोन सभापतीचा पदभार

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झोन सभापतीपदी निवडून आलेल्या गार्गी चोपरा यांनी शनिवारी (ता.२९) झोन सभापती म्हणून पदभार स्वीकारला. मावळत्या झोन सभापती संगीता गिऱ्हे यांनी गार्गी चोपरा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत पदभार सोपविला.

मंगळवारी झोन कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमाला आमदार सुधाकर देशमुख, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त भूषण शिंगणे, मंगळवारी झोनच्या नवनिर्वाचित सभापती गार्गी चोपरा, कर व कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव, मावळत्या झोन सभापती संगीता गिऱ्हे, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक संजय बुर्रेवार, निशांत गांधी, महेंद्र धनविजय, नगरसेविका प्रगती पाटील, सुषमा चौधरी, प्रमिला मंथरानी, ममता सहारे, अर्चना पाठक, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयप्रकाश गुप्ता, भाजपा पश्चिम नागपूर मंडळ अध्यक्ष किसन गावंडे, माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपरा, माजी नगरसेविका शिला मोहोड, संजय मोहोड आदी उपस्थित होते.

Gold Rate
11 April 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver / Kg - 93,100/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी आमदार सुधाकर देशमुख, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह सर्व मान्यवरांनी गार्गी चोपरा यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आमदार सुधाकर देशमुख म्हणाले, गार्गी चोपरा ह्या जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना समर्थन देऊन सभापतीपदी विराजमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मावळत्या सभापती संगीता गिऱ्हे यांनी आपल्या कार्यकाळात उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. सर्वांना सोबत घेऊन जनहिताचे कार्य करण्यासाठी नवनिर्वाचित सभापती गार्गी चोपरा यांना महापौर, सर्व ज्येष्ठ नगरसेवक, प्रशासनातील अधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेऊन काम करावे लागणार आहे. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने येत्या दोन ते अडीच महिन्यात आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे झोनमधील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी गतीने काम करावे, अशी अपेक्षाही आमदार सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ नगसेवक सुनील अग्रवाल यांनी केले तर आभार अनिलकुमार नायक यांनी मानले.

पक्षपरिनिवेश बाजूला ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व : संदीप जोशी
नागपूर महानगरपालिकेमध्ये अत्यंत विनयतेने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून गार्गी चोपरा यांची ओळख आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पक्ष बाजूला ठेवून काम करणारे नेते आहेत. गार्गी चोपरा ह्यासुद्धा पक्षपरिनिवेश बाजूला ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विकासाला साथ देत व पावलावर पाउल ठेवित गार्गी चोपरा काम करतात. त्यामुळे त्यांना सभापतीपदापर्यंत पोहोचण्यात साथ देण्यात आली, असे सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले.

नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये अनेक घडामोडी घडत असतात. यामध्येच ही महत्त्वाची घडामोड आहे. काँग्रेस पक्षाच्या नगरसेविकेला सत्तापक्षाने हा सन्मान दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानत असल्याचे यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सांगितले.

समाजासाठी काम करायला मिळाल्याचा आनंद : गार्गी चोपरा
समाजातील तळागाळातील घटकांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे आनंद आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आमदार सुधाकर देशमुख यांचे आभार. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची दिग्गजांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे कर्तव्य आहे. नागरिकांच्या विश्वासामुळेच इथपर्यंत पोहोचता आले. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास नवनिर्वाचित झोन सभापती गार्गी चोपरा यांनी व्यक्त केला.

सहायक विद्युत अभियंता सालोडकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार
मंगळवारी झोनमध्ये कार्यरत विद्युत विभागाचे शाखा अभियंता एन.बी. सालोडकर व झोनमधील कर्मचारी श्रीमती कुहीकर यांचा आमदार सुधाकर देशमुख, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नवनिर्वाचित झोन सभापती गार्गी चोपरा व मावळत्या सभापती संगीता गिऱ्हे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, तुळशी रोप व भेटवस्तू देऊन सेवानिवृत्ती सत्कारही यावेळी करण्यात आला. मनपा सेवेतील कार्यकाळात अनेक संघर्षाचे प्रसंग आले असले तरी त्याला नम्रतेने पुढे जाऊन सर्वोत्तम देण्याचे कार्य सालोडकर यांनी केले, अशा शब्दांत आमदार सुधाकर देशमुख यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

Advertisement
Advertisement