मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने सत्ता काबीज केली.आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला शिंदे गटाने खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. मात्र पक्ष गळती थांबवण्यासाठी उधार ठाकरे यांनी कंबर कसली आहे.
आज ठाकरेंनी मातोश्रीवर नेत्यांशी चर्चा केली. महत्त्वाच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी चर्चा करण्यासाठी बोलावले होते. यानंतर आता खासदार, आमदारांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्धार केला आहे.
उद्धव ठाकरे यांना धक्यावर धक्के बसत आहेत, पण आता मी धक्का पुरुष झालो आहे. कोण किती धक्के देत आहे, ते बघूया, यांना काय द्यायचा तो एकदाच धक्का देऊ. यावेळी असा देऊ की, हे पुन्हा दिसता कामा नये, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे, सर्वांनी शाखेनुसार दिलेली कामे करावी. विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती आता चूक आता होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.