नागपूर : सध्या सोशल मीडियावर घिबली आर्ट (Ghibli Art) ॲनिमेशनने प्रत्येकाला भुरळ घातली आहे. एआय प्लॅटफॉर्म चॅटजीपीटीच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक व्यक्ती फोटोवरून ॲनिमेशन बनवत आहे.
एआय प्लॅटफॉर्म चॅटजीपीटीच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक व्यक्ती फोटोवरून ॲनिमेशन बनवत आहे. यापूर्वी हे फीचर प्रीमियम युजर्ससाठी होते. पण आता फ्री युजर्स घिबली ॲनिमेशनही तयार करू शकतात. हे घिबली ॲनिमेशन कुठून आलं माहीतआहे का? त्याचे संस्थापक कोण आहेत. हे आज पण जाणून घेणार आहोत.
‘घिबली’ ॲनिमेशन कुठून आले?
‘घिबली’ आर्टची निर्मिती जपानमध्ये झाली.हयाओ मियाझाकी घिबली स्टुडिओचे संस्थापक आहेत. मियाझाकी हे जपानी ॲनिमेशन विश्वाचा बादशहा मानले जातात. त्यांचे सिनेमे जगभर पसंत केले जातात. त्यांनी २५ हून अधिक ॲनिमेटेड चित्रपट आणि टीव्ही मालिका बनवल्या आहेत. स्पिरिटेड अवे हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात २७५ मिलियन डॉलर (२३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त) कमाई केली होती.स्टुडिओ घिबलीने आपल्या भन्नाट ॲनिमेशन चित्रपटांमधून भरपूर पैसे कमावले आहेत.
चॅटजीपीटी प्लॅटफॉर्मवर युजर्स करतायेत घिबली ॲनिमेशन तयार –
सध्या चॅटजीपीटी प्लॅटफॉर्म युजर्ससाठी घिबली ॲनिमेशन तयार करत आहे. असे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, ज्यात लोक आपल्या आठवणी आणि चित्रपटातील दृश्ये घिबली स्टाईलमध्ये दाखवत आहेत. येत्या काळात एआयची आणखी साधनंही अशा इमेज आणि व्हिडिओ तयार करू शकतात.
घिबली स्टाईलची लोकांना भुरळ-
सोशल मीडियावर अनेकांकडून घिबली ॲनिमेशन तयार करून त्याचे फोटो अपलोड करण्यात येत आहे. फार कमी कालावधीचा या घिबली ॲनिमेशनने लोकांवर भुरळ पडली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा ट्रेंड सुरु आहे.