मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोक प्रस्ताव बैठकीत मांडला. याचदरम्यान राज्य सरकारने रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे.
रतन टाटा यांच्या सन्मानार्थ आज राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यावेळी टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला आहे.
या अगोदर शिंदे सेनेच्या सोशल मीडियाचे राज्यप्रमुख राहुल कनाल यांनी रतन टाटांना भारतरत्न द्या, अशी मागणी केली होती.