नागपूर: ज्या तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आॅन लाईन आपली नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांची तूर त्वरित खरेदी करण्यात यावी आणि ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही ती करुन घेण्यात यावी अशी आग्रही मागणी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी केली आहे.
मागील वर्शी तूर उत्पादक शेतकऱ्यांना जो त्रास सहन करावा लागला आणि त्यातून जो प्रचंड असंतोश पेटला त्यातून शासनाने काही धडा घेणे आवश्यक होते. परंतू आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत अशी खोटी आश्वासने देऊन सत्ता प्राप्त करणाऱ्या भाजप शासनाचे धोरण अद्यापही शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंतच पाहत आहे. तूर खरेदीत मागील वर्शी शासनाने जो घोळ घातला तसाच सावळा गोंधळ याही वर्शी सुरु असल्याचा गंभीर आरोपही राजेंद्र मुळक यांनी केला आहे. रामटेक तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेने दिलेल्या माहिती नूसार 18 एप्रिल पावेतो एकून 500 शेतकऱ्यांनी आॅन लाईन नोंदणी केली होती. त्यापैकी 330 शेतकऱ्यांच्या तूरीचेच मोजमाप झाले.
170 शेतकऱ्यांची तूर अद्यापही खरेदी व्हायचीच आहे. सव्र्हेअर बंद झाल्यामुळे 52 शेतकऱ्यांची आॅन लाईन नोंदणीच होऊ शकली नाही. उमरेड मध्ये 1377 शेतकऱ्यांची नोंदणी झाली 1120 शेतकऱ्यांचीच तूर खरेदी झाली 257 शेतकरी अद्यापही शिल्लक आहे. या सर्वांना त्वरित न्याय देने आवश्यक आहे. सव्र्हेअर बंद झाल्याने 250 शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकली नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याच गंभीर आरोपही राजेंद्र मुळक यांनी केला आहे. असेच प्रकार सावनेर, काटोल आणि नागपूर जिल्ह्यातील इतर भागातही सुरु आहेत असेही मुळक यांनी एका पत्रकारा द्वारा कळविले आहे.
शेतकऱ्यांना आॅन लाईन नोंदणी करण्यासाठी एकीकडे भाजप शासन नव नवीन नियम करते. अनेक अडचणींचा सामना करुन जे शेतकरी आॅन लाईन नोंदणी करतात त्यांचाही माल शासन खरेदी करत नसल्याचा तक्रारी सलत वाढत आहेत. या गंभीर बाबीकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे आणि नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा माल त्वरित विकत घ्यावा. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही ती करुन घेण्यात यावी आणि त्या शेतकऱ्यांनाही त्वरित न्याय मिळावा अशी मागणीही राजेंद्र मुळक यांनी केली आहे. शासनाने या गंभीर बाबीची त्वरित दखल घेतली नाही तर संतप्त षेतकरी शासना विरोधात तीव्र आंदोलन उभारतील असा इशाराही राजेंद्र मुळक यांनी दिला आहे.