पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकीसाठी संदीप जोशी यांच्या उमेदवारीच्या प्रचारार्थ धनगर समाज संघर्ष समिती द्वारे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. धनगर समाज संघर्ष समिती (म. रा.) चे संस्थापक अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ञ खासदार विकास महात्मे यांनी संदीप जोशी यांना क्रमांक १ चे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. तरुण, तडफदार , धडाडीची कार्यशैली असणारे, नियोजन कौशल्यात नेहमीच चुणूक दाखविणारे , कुठलेही कार्य हाती घेतल्यानंतर ते पूर्णत्वास नेणारे, सभ्य , सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे संदीपजी जोशी. यांच्यासारखे तरुणच आज समाज परिवर्तनाचं कार्य करू शकतात म्हणूनच अश्या उमेदवाराला निवडून आणणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. महापौर म्हणूनही विशेषतः कोविड काळातही उत्कृष्ट कामगिरी त्यांनी पार पाडली हे विशेष.
याप्रसंगी धनगर समाज संघर्ष समितीचे सचिव श्री. हरीशजी खुजे यांनी प्रास्ताविक केले. धनगर समाज संघर्ष समिति महाराष्ट्र राज्य व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीने आगामी पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी श्री संदीप जी जोशी यांना जाहीर पाठींब्याचे पत्र दिले .
याप्रसंगी बोलताना संदीप जी जोशी यांनी समाजाच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले . पूर्व मुख्यमंत्री देवेन्द्र जी फडणवीस यांनी नागपुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर टाऊन हाॅल बनवण्यासाठी निधी मंजूर केला होता पण जागा निश्चित होऊ शकली नाही ते कार्य महापौर या नात्याने पुढे नेण्याचे काम संदीप जी जोशी यांनी स्वीकारले. तसेच नागपुरातील एका चौकात अहिल्यादेवींचे म्यूरल बनवून सुशोभिकरणाचे कार्य ही ते करणार आहेत. शिक्षक कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडविण्याचेही ते प्रयत्न करतील असे ते म्हणाले . याप्रसंगी धनगर समाज संघर्ष समिती, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. हरीश जी खुजे, मा. श्री गिरीश जी देशमुख, भाजपा नागपूर महानगर, श्री देवेंद्र जी दस्तुरे, भाजपा अध्यक्ष, दक्षिण नागपूर, श्री राजेंद्र जी सोनकुसरे, नगरसेवक, श्री नागेश जी मानकर, नगरसेवक, सौ मंगला ताई खेकरे, नगरसेविका, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे के श्री. महादेवराव पातोंड, मधुकरराव काळमेघ, ध.स.सं. समितीचे पदाधिकारी सुभाष निंगोट, शरद उरकुडे, डॉ विनोद बरडे, सौ वंदना बरडे, मनीष पोराटे, राजेश उपासे, लीलाराम लुचे, किशोर शेळके, धनविजय साटकर, दीपक टापरे व समस्त धनगर बांधव उपस्थित होते.