Advertisement
नागपूर : सक्करदरा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या छोटा ताजबाग परिसरात असलेल्या तारांगण सभागृह जवळील गॉड फादर शॉपला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.आज सायंकाळच्या दरम्यान ही घटना घडली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. शर्तीच्या प्रयत्नानंतर काही काळानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात पथला यश आले आहे.
माहितीनुसार, आज सायंकाळी 7 च्या दरम्यान राहुल प्रकाश हारोडे (रघुजीनगर, छोटा ताजबाग नागपूर) यांच्या मालकीच्या गॉड फादर शॉपला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग इतकी भीषण होती की शॉपमधील 5 लाख रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन पथकाला यश आले आहे. सक्करदरा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.