Advertisement
नागपूर : येत्या ३० मार्चला गुढीपाढवा सण आणि चैत्र नवरात्राला सुरुवात होणार आहे. या सणासुदीच्या काळात लोकांनाच सोने खरेदीकडे मोठा कल असतो. मात्र आता सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं 91000 रुपयांच्या घरात पोहोचले असून सर्वसामान्य लोकांसाठी मोठा धक्का मानाला जात आहे.
24 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ होऊन ते 90980 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ सुरु आहे.
एमसीएक्स वर देखील सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली. गोल्ढ फ्यूचर्समध्ये 0.35 टक्के होऊन 312 रुपयांची वाढ होऊन ते 88696 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. स्पॉट गोल्ड 3079.01 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. यूएस गोल्ड फ्यूचर्स 3086.80 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.