Advertisement
नागपूर : बहीण भावाचे नाते जपणारा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन यानिमित्ताने नागपूरसह देशभरात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २९ ऑगस्टला (मंगळवारी) नागपुरात सोन्याच्या दर वाढून प्रति दहा ग्राम ५९ हजार २०० रुपयांनी वाढला आहे.
नागपूर सराफा बाजारातील दरानुसार २९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३७ वाजता नागपुरात २४ कॅरेटसाठी ५९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५६ हजार २०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ५०० रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ७४ हजार ५०० रुपये होता.