नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात चढ -उतार पाहायला मिळत आहे. मात्र आता वाढत चाललेले दर पाहता सोने लाखाचा टप्पा गाठणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सराफ बाजाराकडे पाठ फिरवल्याचे दिसते.
सोन्याचा भाव वाढतच असून रविवारी प्रति तोळा ८७ हजार ७०० रुपये इतका दर होता. अशी माहिती सराफा व्यावसायिकांकडून देण्यात आली. २० जानेवारीपर्यंतच हाच भाव ८१ हजार रुपये होता. सोन्याची भाववाढ अशीच होत राहिल्यास कदाचित वर्षभरात तो एक लाख तोळापर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान अमेरिकेत सत्ताबदलानंतर धोरणांमध्ये झालेले बदल, कॅनडामधील बँकेचे कमी झालेले व्याजदर, यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
सोन्याचे २०२४-२५ मधील दर-
नोव्हेंबर- ७५ हजार रुपये (प्रतितोळा)
डिसेंबर- ७८ हजार रुपये
जानेवारी- ८२ हजार रुपये
फेब्रुवारी- ८७,५०० रुपये