Advertisement
नागपूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे एका प्रवाशाकडून 50 लाख 75 हजार रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. नागपूर कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) आणि एअर कस्टम्स युनिट (ACU) यांनी ही कारवाई केली. यादरम्यान सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशालाही अधिकाऱ्यांनी अटक केली.
या व्यक्तीकडून मोबाईल, स्मार्ट घड्याळ आणि सेफरॉन असा एकूण 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहम्मद मोगर अब्बास शारजाहून एअर अरेबिया च्या G9-415 या विमानाने नागपुरात आले होते. या मोठ्या तस्करीची गुप्त माहिती विभागाला मिळाली होती. तपासादरम्यान, नागपूर विमानतळावरून बाहेर पडताना प्रवाशाच्या पॅन्टच्या आतील भागात सोन्याचा फवारा मारून काही कपड्यांना शिवले होते.