नागपूर: शहरातील विद्यार्थ्यांना आता डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.मेडिकल एड्युकेशनसाठी विद्यार्थांना करोडो रुपयांच्या खर्च करण्याची कोणतीच गरज भासणार नाही.देशाबाहेर शिकून विद्यार्थी आता एमबीबीएसची डिग्री मिळवू शकतात.युनायटेड स्टडीज ऑफ ऍब्रॉड कन्सल्टंसीच्या पुढाकाराने हे शक्य होणार असून यामुळे विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एरवी डॉक्टर बनण्यासाठी कुशल विद्यार्थ्यांना दीड ते दोन कोटी रुपये मोजावे लागत होते.त्यामुळे विद्यार्थी जरी अभ्यासात पारंगत असला तरी फक्त शिक्षणासाठी लागणाऱ्या करोडो रुपयांच्या खर्चामुळे त्याला आपलले स्वप्न सोडून करियर बनविण्यासाठी दुसराच मार्ग निवडावा लागत होता.
मात्र युसीसीएसी च्या माध्यमातून आता फक्त २० ते २५ लाख रुपयांच्या खर्चात विद्यार्थी त्यांचं डॉक्टर होण्याच स्वप्न पूर्ण करू शकणार आहे.
या माध्यमातून आतापर्यंत २ हजार पेशा अधिक डॉक्टर विदेशातून शिक्षण घेऊन नागपूरमध्ये स्वतःचे क्लिनिक उघडून समाजात सेवा देत आहेत. नुकताच शहरातील राजवाडा पॅलेस मध्ये युनायटेड स्टडीज ऑफ ऍब्रॉड कन्सल्टंसीच्या नवीन डॉक्टरांसाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते .
यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही सहभागी झाले होते .