वेकोलि सुरक्षारक्षाकांच्या धाडीत साडे पाच लाखाचा कोळशा जप्त
कन्हान: वेकोलि गोंडेगाव खुली खदान माती डम्पिंग जवळ वेकोलि दिवसपाळी सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांनी कारवाई करून परिसरात सुरू असलेल्या पाच ते सहा अवैध कोळशा टाल वर धाड टाकुन अंदाजे दहा ते बारा ट्रक कोळशा पकडुन सात ट्रक कोळशा ताब्यात घेत जप्त करून काही कोळशावर डोजर चालवुन मातीत बारीक करून मिळविला तर दोन टालच्या कोळशाला हात लावण्यात आला नाही.
राप्त माहीती नुसार मंगळवार (दि ७) मे ला सकाळी १० वाजता वेकोली गोंडेगाव खुली खदान दिवस पाळी सुरक्षा अधिकारी ओमप्रकाश पाल व सुरक्षारक्षकांनी गोंडेगाव खुली खदान माती डम्पिंग जवळच अवैध कोळशा टालवर धाड टाकुन अकरा ते बारा ट्रक चा कोळसा पकडण्यात आला. यात सात ट्रक कोळसा वेकोलि डेपो डम्पिंग ग्राऊंड मध्ये १५० टन कोळसा उचलून टाकण्यात आला. याची किंमत पाच लाख ५० हजार रूपये असल्याचे बोल ल्या जात आहे. या कारवाईत कोळसा टाल, कोल माफिया, राजकीय व असामाजिक तत्त्वाचा लोकां मध्ये खळबळ उडाली असून वेकोलि सुरक्षा अधिकारी व कन्हान पोलीसामध्ये हडकंप निर्माण झाला आहे. सुत्रांकडून सांगण्यात येते की लोकसभा निवडणुक लागल्याने कोळसा टाल बंद ठेवण्यात आले होते. वेकोलि सुरक्षा अधिकारी व पोलीसांचा आशीर्वादाने परत कोळसा माफिया सक्रिय होऊन जोमाने टालला सुरवात करण्यात अाल्याने अवैध कोळशा चोरी व टालला सुगीचे दिवस आले आहे. यामध्ये कोळशा टाल वाले बाहेर गावचे मजदूर ठेवलेल्या लोकां कडून हजारो टन कोळसा चोरून टाल वर जमा करतात. व बाहेर ट्रक व्दारे नेऊन चांगल्या किंमतीत विकला जातो यात संबंधित अधिकारी यांचे खिसे गरम करून चांगली कमाई असल्याने खुले आम हजारो टन कोळसा मोठ्या प्रमाणा त चोरल्या जाते. मागील महीन्यात नव्याने रूजू झालेले उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुज्जलवार यानी १६ एप्रिल ला कारवाई करून दोन ट्रक, ६१ टन कोळसा व पाच मोटर सायकल सह २५ लाख २२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली होती. यानंतर एकही कारवाई न झाल्याने वेकोलि सुरक्षा अधिकारी व पोलीस मुंग गिळुन गप्प असल्याची चर्चा सुज्ञ नागरीकात चांगलीच रंगत आहेत.
मंगळवारी दुपारी वेकोलि गोंडेगाव खदान परीसरात अवैध कोळसा टालवर वेकोलि सुरक्षारक्षाकांच्या धाडीत मोठय़ा प्रमाणात कोळशा असल्याने व चेहरे पाहुन कार्यवाही होत असल्याने सुरक्षा रक्षक व टालवाले यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी घटना स्थळी शंभर पेक्षा जास्त प्रमाणात कोळसा चोर आपल्या चार चाकी, दोन चाकी वाहना सोबत उभे होते. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कन्हान पोलीस स्टेशनला अकरा वाजता दरम्यान दूरध्वनी वरून सूचना देण्यात आली. मात्र कन्हान पोलीस चार वाजता घटना स्थळी दाखल झाले. तो पर्यंत वेकोलि सुरक्षा कर्मचारी यांनी जिवाची परवा न करता सात ट्रक कोळशा जप्त करून वेकोलि याड मध्ये जमा केला. काही कोळसा जमीनीवर पडला असल्याने डोजर चालवुन मातीत मिळविला तर दोन टाल वरच्या कोळशाला हात लावु शकले नाही. या कारवाई दरम्यान पोलीस घटनास्थळी ताबडतोब पोचली असती तर चित्र वेगळेच असते. कन्हान पोलीस अधिकारी आणि वेकोलि गोंडेगाव सुरक्षा अधिकारी एकमेकावर ताशोरे उठवित असुन कन्हान पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने पाणी कुठे तरी मुरत असल्याचे लोकांच्या उलट सुलट चर्चेला उधाण आलेला आहे.
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी करण्या-या चोराचा थांगपत्ता लागत नसल्याने परिसरात चोरीचा घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असामाजिक तत्त्वाचा लोकात व चोरामध्ये पोलीसाबद्दल भीतीचे वातावरण संपले असल्याचे कन्हान शहरात नागरीका कडून बोलले जात आहेत. या विषयावर वरिष्ठ अधिकारी यांच्या कडुन उच्च स्तरीय चौकशी व योग्य कार्यवाही कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.