Published On : Fri, Apr 16th, 2021

गोंदिया: ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेत वाढ करा- नवाब मलिक

Advertisement

आरोग्य विषयक सुविधांवरुन पालकमंत्र्यांची प्रशासनाला फटकार

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून त्याला वेळीच प्रतिबंध लावण्यात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरले. आरोग्य विषयक सोयी सुविधांच्या अभावी जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत, आठ दिवसात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी 16 अप्रैल आयोजित आढावा बैठकीत दिले. खा. पटेल यांनी पालक मंत्री नवाब मलिक यांच्याशी आरोग्य मूलभूत सुविधेसाठी दूरध्वनीवरुन सविस्तर चर्चा केली.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून ग्रामीण भागात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी कोविड केअर सेंटर तसेच आरोग्य विषयक सोयी सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी माजी आ. राजेंद्र जैन यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात दररोज ६०० कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. परिणामी शासकीय आणि खासगी रुग्णालयात सुध्दा जागा अपुरी पडत आहे. खाटा कमी पडत असल्याने रुग्ण उपचारासाठी वेटींगवर असल्याचे चित्र बिकट चित्र आहे. तर रुग्ण वाढत असल्याने ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला असून त्यात त्वरित वाढ करण्याची गरज आहे. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ एकच आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा असल्याने या प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे रुग्णांना अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे नवीन आरटीपीसीआर मशिन त्वरित खरेदी करण्यात यावी. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार लीटर क्षमतेचे ऑक्सीजन जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी सुध्दा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तो लवकर सुरु झाल्यास जिल्ह्यात ऑक्सीजनची समस्या निर्माण होणार नाही. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा त्वरित पुरवठा करण्यात यावा. शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन बेडची संख्या वाढविण्यासाठी आक्सीजन कंसर्टटेटरची खरेदी करण्यात यावी. गोंदिया येथे एकमेव शासकीय रक्तपेढी असून त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून आवश्यक सोयी सुविधा सुध्दा नाहीत. त्यामुळे नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असते.

त्यामुळे या रक्त पिढीचे आधुनिकीकरण करण्यात यावे. अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून ऑक्सीजन टँक उभारण्याचे काम सुरु असून ते युध्द पातळीवर पूर्ण करण्यात यावे. केटीएस रुग्णालयातील डॉक्टरांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच ऑक्सीजनची समस्या दूर करण्यासाठी भिलाई येथून लिंक करण्यात यावे. आदी मागण्याबाबत खा. प्रफुल्ल पटेल आणि माजी आ. राजेंद्र जैन यांनी लक्ष वेधले. कोरोना परिस्थिती आरोग्य विषयक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल आणि माजी आ.राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापूरे प्रयत्नरत आहे. पालकमंत्र्यांसह चर्चा करताना सर्वच पक्षाचे आमदार व प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी सुध्दा सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी खा. श्री प्रफुल पटेल यांचा जिल्यातील आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता मा. पालक मंत्री यांना पत्र देतांना माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर, रमेश ताराम, विनीत सहारे व पक्ष के पदाधिकारी उपस्थित होते.
.
रेमडेसिविर इंजेक्शनचा स्टॉक वाढविणार
कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचा स्टॉक वाढविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील आरोग्य विषयक सोयी सुविधा वाढ करण्यासंदर्भात खा. प्रफुल्ल पटेल यांनी मोबाईलवरुन पालकमंत्र्यांसह चर्चा केली.


डाॅक्टरांची रिक्त पदे त्वरित भरा
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची दीडशेवर पदे रिक्त आहेत. यामुळे कोविड काळात आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अशात जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी.

लसींचा पुरेसा पुरवठा करा
कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्याला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांना लसीकरण करण्यात आले. मात्र लसींचा पुरवठा होत नसल्याने वांरवार लसीकरण मोहीमेला ब्रेक लागत आहे. लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यासाठी पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात यावा.

४०० बेडचे कोविड सेंटर सुरु करा
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात खाटांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे ४०० खाटांचे कोविड केअर त्वरित सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा.

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात बेड वाढविणार
तिरोडा तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असून येथील उपजिल्हा रुग्णालयात केवळ २० बेडची सुविधा आहे. ती वाढवून ५० बेड करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी नवीन आरटीपीसीआर मशिन आठ दिवसात खरेदी करण्याचे निर्देश दिले.

रवि आर्य

Advertisement