गोंदिया/नागपूर: गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) दहशतवादाशी संबंधित प्रकरणातील प्रमुख संशयित अब्दुल कादिर पठाण याला पुण्यातील दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) ताब्यात दिले आहे. अब्दुल कादिर पठाण (वय 35) हा मूळचा पुण्यातील हलिमुक्कम कोंढवा येथील असून, तो महाराष्ट्र राज्यातील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी गोंदिया पोलिसांनी पठाण याचे पितळ उघडे करत.त्याचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आणि गोंदियाशी संबंध असल्याचा छडा लावला होता.पुढील तपासानंतर अधिकाऱ्यांनी त्याला पुणे येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला .जिथे तो दहशतवादाशी संबंधित विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे.