
Representational Pic
सालेकसा (गोंदिया)। स्थानिक मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडाळाच्या वतीने प्राचार्य डाॅ.एच.बी.चैरसिया यांच्या अध्यक्षतेखाली, डाॅ.बी.के.जैन, डाॅ. यू.एम.पवार, डाॅ.एन.एम.हटवार,डाॅ.जी.एस. हलमारे, प्रा.भगवान साखरे यांचे उपस्थितीत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुर!वात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन कर!न करण्यात आली, यावेळी डाॅ.चैरसिया यांनी लोकमान्य टिळकांचे कार्य या देशातील युवकांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा अंगिकार युवकांनी करावा असे आवाहन केले. उपस्थित पाहुण्यांनी समयोचित आपले विचार व्यक्त कर!न विद्याथ्र्यांना टिळकांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन डाॅ.बाबुसिंग राठोड व आभार प्रदर्शन प्रा.अश्विन खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.ममता पालेवार, प्रा.श्रीकांत भोवते, प्रा. परिमल डोंगरे, प्रा.बी.एन.पांडे, प्रा.जोगी, प्रा.रामा लिल्हारे यांनी परिश्रम घेतले.