मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरातील विविध सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळांना भेट दिली. दुर्गा उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा. या उत्सावाच्या माध्यमातून आई जगदंबेच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात समृद्धी व सुख समृद्धी येवो अशा शुभकामना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनिष नगर येथील एकता दुर्गा उत्सव मंडळ, नरेंद्र नगर येथील नरेंद्र नगर दुर्गा उत्सव मंडळ, खामला येथील नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ, जयताळा येथील आई तुळजा भवानी मंदिर, यशोधरा नगर येथील रेणूका माता मंदिर, हिलटॉप येथील दुर्गा उत्सव मंडळ, लक्ष्मीनगर येथील लक्ष्मीनगर दुर्गा उत्सव मंडळ, अजनी चौकातील स्टार दुर्गा पुजा उत्सव मंडळ,छोटी धंतोली येथील एकता जनसेवा मंडळ, गणेशपेठ येथील आगाराम देवी मंदिर, टिंबल मार्केट येथील पाटीदार समाज भवन, क्वेटा कॉलनीतील नवरात्र उत्सव मंडळ, श्री कच्च पाटीदार समाज दुर्गा उत्सव मंडळ, पारडी येथील श्री भवानी माता सेवा समिती श्री भवानी माता मंदिर तसेच कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर येथे भेट देऊन श्री जगदंबा व दुर्गा देवीचे दर्शन केले.
दुर्गा उत्सव सार्वजनिक मंडळातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले.