नागपूर : राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी गुड न्युज समोर येत आहे.गेल्या काही दिवसांपासून माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न पात्र महिलेला पडला होता.
खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार अशी माहिती दिली होती. यापार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणेच सहावा हप्ता मिळणार आहे.
सरकारकडून डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.
लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता याच महिन्यात मिळणार-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणं अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.