नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करून ती ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्यात आली आहे. यामुळे दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सणासुदीच्या काळात मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना होणार असून त्यांना महागाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे.