नागपूर : शहरातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नागपूर ते मडगाव दरम्यान रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव स्पेशल एक्स्प्रेस, जी पूर्वी २८ सप्टेंबरपर्यंत चालणार होती, ती आता २८ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०११४० मडगाव-नागपूर स्पेशल एक्स्प्रेसही यापूर्वी २९ सप्टेंबरपर्यंत चालवली जाणार होती, ती आता २९ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ही ट्रेन नागपूरहून मंगळवार आणि रविवारी आणि मडगावहून बुधवार आणि शनिवारी धावेल. तारखांमध्ये वाढ झाल्याने आता नागपूर ते गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे, कारण त्यामुळे अधिक प्रवाशांना प्रवास करण्याची संधी मिळणार असून गर्दीही कमी होईल.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. यामुळे नागपूर ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासात आराम आणि सुविधा उपलब्ध करून देणारा अतिरिक्त पर्याय उपलब्ध होईल.