मुंबई– फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला असून, त्यात ओबीसींंसाठी भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत. ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाची बांधणी करण्याकरिता दोनशे कोटी रुपये देणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.
या योजनेंतर्गतओबीसी मुला-मुलीसाठी 36 वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. संजय गांधी अन् श्रावणबाळ योजनेचे मानधन 600 वरून 1000 रुपये करण्याची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
धनगर समाजाच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी आदिवासी विभागाच्या बजेटला धक्का लागणार नसून स्वतंत्रपणे तरतूद करण्यात आली आहे.
अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या महिला कल्याणासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद मालेगाव येथे आयटीआय सुरू करणार आहे.