मुंबई : शेतकऱ्यांच्या डोळयात सध्या कांदयाने पाणी आणले असून त्यांना दिलासा देण्याऐवजी तोकडे अनुदान देवून मदतीचा आव आणत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टाच केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मिडियाशी बोलताना केला
गुरुवारी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रूपये ट्रान्सपोर्ट अनुदान जाहीर केले. नाशिक जिल्ह्यात पिकणारा कांदा जिल्ह्याबाहेरही जातो. त्यामुळे या अनुदानासहित राज्य सरकारने कांदा जिल्ह्याबाहेरही पाठवण्यासाठीही अनुदान द्यावे अशी मागणीही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली.
कांदयाची किंमत इतकी घसरली असताना सरकार किलोमागे फक्त दोन रुपये अनुदान देवून कसे परवडेल? नाशिकचा कांदा या अनुदानात गुजरात आणि दिल्लीपर्यंत कसा जाईल असा सवाल करतानाच सरकारने शेतकऱ्यांना वाढीव मदत दयावी अशी मागणीही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली.