मुंबई: महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील मल्लांनी जगभर नावलौकिक मिळवला आहे. यामुळे कुस्तीला उर्जितावस्था आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पैलवानांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांची भेट घेतली, त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री राहुल कुल, बाळा भेगडे, चंद्रदीप नरके, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, पापालाल कदम, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, राहुल काळभोर, बापू लोखंडे यांच्यासह पैलवान उपस्थित होते.
दीनानाथ सिंह यांनी पैलवानांना वाढीव पेन्शन मिळावी, एसटीचा प्रवास मोफत मिळावा, शासकीय विश्रामगृहात सोय व्हावी, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, अशा मागण्या मांडल्या.