नागपूर : राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. यात मराठा, धनगर, ओबीसी आणि इतरही समाजाचा समावेश आहे. सरकार प्रत्येक समाजाबाबतीत संवेदनशील आहे. प्रत्येक आंदोलनाची सरकार दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देईल, असे विधान सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात केले.
जनतेला सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे त्याठिकाणी मागण्यांसाठी आंदोलन करायलाच हवे.मात्र महाविकास आघाडी सरकार केवळ कुटुंबासाठी काम करणारी होती. त्यामुळे त्यांना जनतेचे आणि विकासाचे प्रश्न महत्त्वाचे नव्हते. शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार प्रत्येक आंदोलनाची दखल घेत गंभीरपणे काम करत आहेत, असेही मुनगंटीवार म्हणाले. ते नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.
एका बॅनरवर मुख्यमंत्र्याच्या नावावर हिंदूहृदय सम्राट लिहिले त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र या फलकाचा एवढा बाऊ करून राजकारण करणे, याला काही अर्थ नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सरकारात्मक पाऊले उचलत आहेत. त्यामुळे दोन गटात तेढ निर्माण होऊन वाद पेटेल, असे विधाने करू नका, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.