Published On : Wed, Mar 5th, 2025
By Nagpur Today Nagpur News

सरकारचा मोठा निर्णय;प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ,महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा

Advertisement

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. या प्रतिज्ञापत्रासाठी नागरिकांना 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागत होते.याचा सर्वाधिक फटका विद्यार्थांना बसत होता.

विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखल, जात पडताळणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्रासह इतर अनेक प्रमाणपत्रासाठी 500 रुपये प्रत्येकी लागत होते. म्हणजे केवळ मुद्रांक शुल्कापोटीच विद्यार्थ्यांना वर्षाला 2 हजारांहून अधिकचा खर्च येत होता. पण आता हा खर्च वाचणार आहे.

Gold Rate
Wednesday 05 March 2025
Gold 24 KT 86,700 /-
Gold 22 KT 80,600 /-
Silver / Kg 96,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली. साधारणतः दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च लागतो.

शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ करण्यात आले आहे. आता हा खर्च वाचणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांनी आदेश दिला आहे. यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार नाही. त्यांना मुंद्राक शुल्काशिवाय प्रमाणपत्र देण्यात येईल.

Advertisement