नागपूर : महाराष्ट्र व तामीळनाडू राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे आज विशेष विमानाने चेन्नई येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर सायंकाळी 5 वाजता आगमन झाले. त्याप्रसंगी स्वागत करण्यात आले. स्वागताचा स्वीकार करुन राजभवनकडे प्रयाण झाले.
राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना सशस्त्र पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. संस्कृत विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. संजीव इंदुरकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शुक्रवार, दिनांक 22 सप्टेंबर रोजी नागपूर येथे आगमन होत आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव राष्ट्रपती कोविंद यांचे विमानतळावर स्वागत करतील. त्यानंतर राष्ट्रपती समवेत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील.