नागपूर: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आज शुक्रवार दि. 28 मार्च रोजी रात्री 9.40 वाजता मुंबई येथून विमानाने आगमन होइल व रात्री राजभवन येथे मुक्काम करतील.
शनिवार दि. 29 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता एम्स येथे आयोजीत पहिल्या पदवीदान समारंभात उपस्थित राहातील. त्या नंतर राजभवन येथे आगमन होईल व मुक्काम करतील. शनीवार दि. 30 मार्च रोजी सकाळी 8.40 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्री विमानतळ येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आगमन प्रसंगी उपस्थित राहतील. प्रधानमंत्री यांच्या नागपूर शहरात नियोजीत कार्यक्रमाला राज्यपाल उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 1.35वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रधानमंत्री यांच्या प्रस्थाना प्रसंगी निरोप देण्यासाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपस्थित राहतील. त्यानंतर राजभवन येथे आगमण व राखीव. राज्यपाल सायंकाळी 6.40 वाजता राजभवन येथून विमानतळासाठी प्रयाण करतील व रात्री 7.35 वाजता विमानाने मुंबईसाठी प्रयाण करतील.