Advertisement
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामनवमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आनंद आणि उत्साहात साजरा करण्याचा दिवस आहे. मात्र यंदा आपण एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. त्यामुळे रामनवमीचा सण आपल्याला आपल्या घरीच भक्तीभावाने साजरा करायचा आहे.
प्रभू रामाचे उन्नत जीवन व उच्च आदर्श मानव जातीला नेहमीच योग्य मार्गाने चालण्याची प्रेरणा देत राहतील. सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.