Published On : Wed, May 5th, 2021

कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य व पोलीस विभागात शासनाने तात्काळ भरती करावी ! – डॉ. आशिष देशमुख

Advertisement

“कोरोनाने महाराष्ट्र राज्यासह देशात थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस राबत आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे आणि त्याचा सामना करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. सगळ्यात बिकट परिस्थिती महाराष्ट्र राज्याची आहे. राज्याचा आरोग्य विभाग अहोरात्र झटत असला तरी या यंत्रणेत डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, क्लर्क आणि टेक्निशियनसह क आणि ड वर्गातील मनुष्यबळाचा मोठा तुटवडा आहे.

कोरोनाच्या अशा गंभीर परिस्थितीत राज्याची आरोग्य व्यवस्था अतिशय मजबूत असणे आवश्यक आहे. राज्यात आरोग्य विभागात ५६ संवर्गात हजारो पदे रिक्त असून ‘सरळ सेवा आरोग्य भरती’च्या माध्यमातून शासनातर्फे या जागा भरण्यात येणार, असे मागील सव्वा वर्षापासून ऐकण्यात येत आहे. पदभरतीच्या परीक्षेनंतर पात्र असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. परंतु, प्रत्यक्ष भरतीसाठी ठोस पावले उचलण्यात आल्याचे दिसत नाही. आरोग्य विभागातील ही रिक्त पदे लवकरात लवकर भरुन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारने तयारीला लागणे आवश्यक आहे.”

Gold Rate
Thursday 20 March 2025
Gold 24 KT 89,200 /-
Gold 22 KT 83,000 /-
Silver / Kg 100,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

“आरोग्य विभागासोबतच पोलिसांची फार मोठी गरज या कोरोना काळात आहे. राज्यात पोलीस दलाचा तुटवडा आहे. पोलीस विभागात हजारो जागा रिक्त आहेत. एकूण रिक्त जागांपैकी सुरुवातीला १२००० रिक्त जागा भरण्यात येतील, असे शासनाने फार पूर्वीच जाहीर केले होते. परंतु, पोलीस विभागातील या १२००० रिक्त जागांच्या भरतीसाठी युवक-युवती कित्येक महिन्यांपासून ताटकळत थांबले आहेत. ही भरती देखील तात्काळ करण्यात यावी. त्यामुळे कोरोनासंबंधी कायदा व सुरक्षेची जी परिस्थिती उद्भवत आहे, ती हाताळण्यास मदत होईल आणि महत्वाचे म्हणजे युवक-युवतींना रोजगार मिळेल.

युवक-युवतींमध्ये बेरोजगारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. वर्षभरापासून कोरोनामुळे देखील अर्थ व्यवस्था मंदावली आहे. त्यामुळे असलेले रोजगार जात आहेत तसेच खाजगी क्षेत्रात नवीन रोजगार कुठेही मिळतांना दिसत नाहीत. शेतीची देखील परिस्थिती भीषण झाली आहे. कोरोनाच्या अशा परिस्थितीत राज्य सरकारने आरोग्य व पोलीस या दोन्ही विभागात तात्काळ भरती करून, युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून मदत करावी”, अशी मागणी माजी आमदार व कॉंग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Advertisement
Advertisement