रामटेक – महाराष्ट्रात आज कोरोणा विषाणू ने थैमान घातले आहे.आता पर्यंत ही महामारी शहरात होती. पण आता ग्रामीण भागात सुद्धा कोरोना ची दहशत पसरली आहे. नुकतेच नगरधन येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आला असून तीन दिवसानंतर हिवरा बाजार येथे एक व्यक्ती कोरोणा पॉझिटिव आढळुण आल्यामुळे हिवरा बाजार येथे सर्वत्र भीतीची दहशत पसरली आहे. सदर माहिती नुसार मुंबई वरून दोन व्यक्ती हिवरा बाजार येथे आले,
आरोग्य विभागला ही माहिती मिळताच आरोग्य विभाग व शासकीय यंत्रणा ने लगेच दखल घेतली.
त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला व त्याला नागपूर च्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाचा सोबत आलेल्या व्यक्ती ची रिपोर्ट निगेटिव्ह आली असून संपर्कात आलेल्या 4 लोकांना हिवरा बाजार येथील जि. प शाळा हिवरा बाजार येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. रुग्णाच्या शेजारच्या 4 घरातील ऐकून 20 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पहिला रुग्ण नगरधन व दुसरा रुग्ण हिवरा बाजार येथे आढळला असून आता संपूर्ण रामटेक तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे….
स्वतः ची काळजी घेणे फार गरजेचे आहे, नाही तर कोरोना विषाणू घरो घरी येणार
उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटियारे, तहसीलदार बाळासाहेब मस्के, देवलापार पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे , वैदकिय अधिक्षक डॉ प्रकाश उजगरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ चेतन नाईकवार,सरपंच गणेश चौधरी व ग्रामीण आरोग्य केंद्राचे कर्मचारी, ह्याँ गंभीर बाबिवर बारीक लक्ष ठेउन आहेत.
कोरोना आजाराची साथ पसरू नये या करीता आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, अधिकारी तसेच ग्रामपंचायत मार्फत नागरीकांना आवाहन करण्यात येते कि आपल्या घरी येणारे आशास्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक यांनी विचारलेल्या प्रश्नाची माहिती न लपवीता खरी सांगण्यात यावी तसेच आपल्या गावात बाहेर गावातुन परजिल्हातुन, परराज्यातुन तसेच बाधीत क्षे़त्रातुन येणाऱ्या नागरीकांनी ग्रामपंचात किंवा सरकारी दवाखाना येथे नोंद करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी संपूर्ण नागरिकांना केले.