रामटेक :गट ग्रामपंचायत कांद्री खदान येथे दर वर्षी प्रमाने ह्या वर्षी सुध्दा शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थितांच्या हस्ते माल्यार्पन करण्यात आले.
यावेळी सरपंच परमानंद शेंडे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी पं.स.सदस्या रिता कठौते,ग्रा.पं.सदस्य विक्की देशमुख, सरपंच परमानंद शेंडे,प्रितम हारोडे, सुभाष भोयर,राजु कुपाले, पटेल बर्वे तसेच गावातील सन्माननीय मंडळी उपस्थित होती. प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी नरेंद्र गाडगे तर आभार प्रदर्शन ओमकार मुळेवार यांनी केले.