उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांचा मार्फत दिनांक ९ आणि १० डिसेंबरला जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे भव्य असा नमो महारोजगार मेळावा आयोजित आहे.
या महारोजगार मेळाव्यामध्ये १०,००० पेक्षा जास्त कुशल – अकुशल आणि अर्धकुशल तांत्रिक / अतांत्रिक क्षेत्रातील व प्रोफेशनल रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस महाराष्ट्र शासनाचा आहे. तसेच किमान १०, १२ वी पास – नापास तसेच पदविका, पदवी – पदव्युत्तर धारकांना देखील संधी उपलब्ध करून देण्यात येईल.
या मेळाव्यात कोणत्या कंपनीत आणि किती पदांसाठी भरती करायची आहे, त्यासाठीची शैक्षणिक पात्रता काय याची माहिती दिली जाईल. तरुण – तरुणींचा बायोडेटांची छाननी करून काहींना मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर दिल्या जातील. तसेच प्राथमिक निवड केलेल्या शॉर्ट लिस्ट उद्योजकांमार्फत केली जाईल. नागपूरच्या मेळाव्यासाठी इच्छुक तरुण – तरुणींची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर तसेच होर्डीग / बॅनर इ. QR Code देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या माध्यमातून दिनांक 28/11/2023 पासुन सुरू होणार आहे.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींचे नेतृत्वात त्यांच्या स्वप्नातील आपला भारत देश लवकरच 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गाठण्याचा प्रयत्न करतो आहे व जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या ऐतिहासिक क्षणाकडे वाटचाल करत आहे.
महाराष्ट्र हे भारताचे ‘ ग्रोथ इंजिन ‘ असून, लोकसंख्येचा फायदा आणि आर्थिक क्षेत्राच्या विकासाची गती यामुळे अर्थव्यवस्थेत 1 ट्रिलियन डॉलरचा मोठा वाटा उचलण्याचे उद्दिष्ट आक्रमकपणे ठेवले आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनवीन व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींसाठी आपली क्षितिजे विस्तारत आहे. वाढत्या गुंतवणुकीमुळे कुशल कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गरजेसह रोजगाराच्या संधींमध्ये वाढ देखील होत आहे.
हे एक अनोखे व्यासपीठ राहणार आहे की जिथे 2 दिवसांत जवळपास 50,000 तरुणांची उपस्थिती अपेक्षित आहे. हा मेळावा नौकरी ईच्छूक उमेदवार व उद्योजकांना / नियुक्ते यांना नोकरी मिळवुन देण्याकरीता अत्यंत आवश्यक माध्यम ठरेल अशी अपेक्षा आहे.
याच अनुषंघाने रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरीता जिल्हा अधिकारी डॅा. विपिन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता, हॉटेल तुली इम्पीरियल, नागपूर येथे एच आर मीट चे देखील आयोजन करण्यात आले आहे. १०,००० रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरीता शासन स्थरावर वेगवेगळे प्रयत्न चालु आहे, त्यातील एच आर मीट हा एक प्रयत्नआहे.
पत्रकार परिषदेमध्ये प्रमुख उपस्थिती
१. पुरुषोत्तम देवतळे,
सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य.
२. किरण मोटघरे,
प्रभारी सहसंचालक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य
३. प्रकाश देशमाने,
उपायुक्त,स्किल इंडिया विभाग, नागपूर विभाग
४. शिवानी दाणी वखरे
समन्वयक, नमो महारोजगार मेळावा समिती
५. कुणाल पडोळे,
समन्वयक, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेल, नमो महारोजगार मेळावा समिती