नागपूर – स्व. रा. पे. समर्थ स्टेडियम, चिटणवीस पार्क येथे आमदार प्रवीण प्रभाकर दटके यांच्या संकल्पनेतून ‘आमदार क्रीडा महोत्सव २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले. या महोत्सवात खो-खो, कबड्डी, चेस, कॅरम आणि कुस्ती या पाच खेळांचा समावेश करण्यात आला असून, स्थानिक युवा खेळाडूंना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन मा. गिरीष व्यास (माजी आमदार) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रकाश चंद्रयान, संजय बालपांडे (माजी नगरसेवक), रवींद्र फडणवीस, सुधीर निंबाळकर, डॉ. विवेक अवसरे, अनिल गुलगुले, किशोर पालंदुरकर, प्रशांत जगताप, हेमंत बालभुडे, दिनेश चावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संयोजक पलाश जोशी आणि शुभम राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वर्षा पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले.
या उपक्रमामुळे नागपूरमधील क्रीडाप्रेमींना नवसंजीवनी मिळणार असून, स्थानिक पातळीवर क्रीडा संस्कृतीला मोठा बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.