Published On : Mon, Jan 8th, 2018

वोक्‌हार्ट हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजनद्वारे आयोजित नागपूरमधील पहिल्या किडॅथॉनला प्रचंड प्रतिसाद

Advertisement


नागपूर: वोक्‌हार्ट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजन (आरसीएनव्ही) यांच्यावतीने आयोजित नागपुर शहरातील पहिल्या ‘किडॅथॉन’ला (लहान मुलांसाठी मॅरॅथॉन) प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारोंच्या संख्या मध्ये लहान चिमुकल्यांनी गर्दी केली होती या किडॅथॉनचे रविवार दि. ७ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. ‘जयपूर फूट’ला पाठिंबा आणि सहकार्य दर्शविण्यासाठी आयोजित या पहिल्या किडॉथॉनमुळे रामगिरी, सिव्हिल लाईन्स हा भाग चिमुकल्यांच्या चिवचिवाटाने फुलून गेला होता. शहरातील सेंटर पॉईंट, भवन्स, मॉडर्न अशा विविध शाळांतील मुलांनी यात सहभाग घेतला. वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉ. समीत पाठक (कार्डियो थोरॅसिकसर्जन व व्हॅस्क्युलर सर्जन) यांनी या किडॅथॉनला हिरवी झेंडी दाखवून याची सुरुवात केली.

शालेय अभ्यास आणि होमवर्क यात व्यस्त असलेल्या मुलांसाठी हा उपक्रम उत्साह भरणारा ठरला. लहान वयातच खिलाडूवृत्ती आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व रुजवण्याचाही हा एक प्रयत्न होता.

वोक्‌हार्ट हॉस्पिटलद्वारे वेळोवेळी आयोजित केल्या जाणार्‍या सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांमधेय ‘किडॅथॉन’ हा आणखी एक उपक्रम होता. तीन वयोगटांमध्ये या मॅरॅथॉनचे आयोजन केले गेले :- ६ ते ८ वर्ष (२००० मीटर्स); ९ ते ११ वर्ष (३००० मीटर्स) आणि १२ ते १४ वर्ष (४००० मीटर्स). सकाळी ७.०० वाजता या किडॅथॉनला झाली. प्रत्येक सहभागीला एक निःशुल्क टी शर्ट, पदक, सहभागाचे प्रमाणपत्र व भेट दिले गेले.

Gold Rate
15April 2025
Gold 24 KT 93,500/-
Gold 22 KT 87,000/-
Silver / Kg - 95,800/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement