Published On : Tue, May 21st, 2019

महा मेट्रो : मेट्रो पिल्लरचे विद्रुपीकरण केल्या बद्दल नागपूर मेट्रो तर्फे एफआयआर दाखल

मेट्रो मालमत्तेचे विद्रुपीकरण करू नये महा मेट्रो नागपूरचे नागरिकांना आवाहन

नागपूर: वर्धा रोड वरील एयरपोर्ट मेट्रो स्टेशन जवळील एका पिल्लरचे विद्रुपीकरण केल्या प्रकरणात सोनेगांव पोलीस स्टेशन येथे महा मेट्रो,नागपूर तर्फे एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मेट्रो पिल्लर क्रमांक ३५ चे विद्रुपीकरण करत त्यावर लेखान केल्या प्रकरणी अनोळख्या इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मेट्रो पिल्लरचे विद्रुपीकरण झाल्याच्या या घटनेची महा मेट्रो तर्फे गंभीर दखल घेण्यात आली असून या अंतर्गत तक्रार दिल्या नंतर नागपूर सोनेगांव पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड सहिता १८६० च्या कलम २९४ तसेच सार्वजनिक संपती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या अंतर्गत अश्या प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्याऱ्या व्यक्तीला अटक होऊ शकते तसेच त्याच्याकडून दंड देखील आकाराला जाऊ शकतो. महा मेट्रो नागपूर तर्फे प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाली असून खापरी ते सिताबर्डी दरम्यान मेट्रो ट्रेनच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. एकीकडे प्रवासी वाहतुकीला नागपूरकर प्रतिसाद देत असतांना दुसरी कडे मात्र नागपूर मेट्रो प्रकल्पांच्या अंतर्गत असलेल्या मालमत्तेच अश्या प्रकारे विद्रुपीकरण होत आहे.

मेट्रो पिल्लर वर पोस्टर,जाहिरातीचे फलक लावणे, लिखान करने किंवा कुठल्याही प्रकारे विद्रुपीकरण करने बेकायदेशीर असून हा दंडात्मक गुन्हा आहे. गुन्हेगाराला कायद्याच्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते तसेच दंड देखील आकाराला जाऊ शकतो. नागपूर मेट्रो तर्फे आवाहन केले जाते की अश्या प्रकारचे कुठलेही विद्रुपीकरण करू नये. शहरात सुचारू वाहतूक व्यवस्था सुरु करण्याचा मनोदय मेट्रोचा असून या प्रकल्पाला नागपूरकरांनी सहकार्य करावे असे आवाहन मेट्रो तर्फे केले जात आहे.

Advertisement