उमरेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
आज वृक्षदिंडी नागपुरात
सात दिवस केले वृक्षारोपण व जनजागरण
‘ग्रीन अर्थ ऑर्गनाझेशन’ च्यावतीने काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीचा समारोपीय सोहळा शनिवार, २९ जून रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. उमरेड येथील दुर्गा स्टेज, जुना मोटर स्टॅण्ड, इतवारी पेठ येथे होणार्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार आहेत.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, उमरेडच्या नगराध्यक्ष विजयालक्ष्मी भदोरिया, प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, माजी खासदार दत्ता मेघे व अजय संचेती, सर्व आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार अशोक मानकर व गिरीश गांधी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पी. कल्याण कुमार, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, अशोक गिरीपुंजे, श्रीमती नन्नावरे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धीविनायक काणे, अजय पाटील, डॉ. राजीव पोद्दार, प्रवीण दटके, कौस्तुभ चॅटर्जी यांचीही उपस्थिती राहणार आहे.
आज वृक्षदिंडी नागपुरात
आमदार प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वृक्षदिंडीला २३ जून रोजी वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथून प्रारंभ झाला होता. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये वृक्षदिंडीच्या माध्यमातून वृक्षारोपण व जनजागरण अभियान राबविल्यानंतर शुक्रवार, २८ जून रोजी पारडसिंगा, काटोल, कळमेश्वर मार्गे नागपुरात पोहोचत आहे. हिंगणा, हिंगणा टी पॉइंट, लक्ष्मीभुवन चौक, कमाल चौक, गोळीबार चौक, डॉ. आंबेडकर चौक, जगनाडे चौक, अशोक चौक, कॉटन मार्केट मार्गे ती रवीभवन येथे पोहोचेल व येथे मुक्काम करेल. २९ तारखेला उमरेडसाठी रवाना होणार असून तेथे वृक्षदिंडीचा समारोप होणार आहे, असे आमदार प्रा. अनिल सोले यांनी कळविले आहे.