Advertisement
राजे रघुजीराव भोसले यांच्या जयंती निमित्त महापौर श्रीमती नंदा जिचकार, उपमहापौर श्री.दिपराज पार्डीकर, जलप्रदाय समिती सभापती श्री.विजय (पिन्टू) झलके यांनी सक्करदरा चौक स्थित राजे रघुजीराव भोसले यांच्या प्रतिमेला नगरीच्या वतीने तीलक करुन पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी सर्वश्री श्रीमंत राजे रघुजा महाराज भोसले, श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले, युवराज जयसिंहराजे भोसले, सक्करदरा व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. सतिश चौधरी व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.