Advertisement
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी विश्वकर्मा नगर येथील तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नगरसेवक सतीश होले, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे दुर्गादासजी रक्षक, लक्ष्मणराव शिंदे, बाळकृष्ण पाचभाई, भाऊराव तायवाडे, बाळकृष्ण भेंडे, रमाताई भेंडे, शशिकला शेंडे, रा.ब. बोडखी यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.